युवा रक्तदाता संघटनेची मागणी
प्रतिनिधी / ओटवणे:
जिह्यात व्हेंटिलेटर ऍम्ब्युलन्सअभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. जिह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर ऍम्ब्युलन्स असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर ऍम्ब्युलन्ससाठी शासनाकडे त्वरीत पाठपुरावा करावा, अशी मागणी सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.
सावंतवाडी तालुक्यात अनेक गावे असल्याने रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच अत्यवस्थ रुग्णांना गोवा-बांबोळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी बऱयाच रुग्णांचे ऍम्ब्युलन्सअभावी प्राण जात आहेत. सावंतवाडी तालुक्याला व्हेंटिलेटर ऍम्ब्युलन्ससाठी ओरोसच्या 108 ची वाट पाहत रहावी लागते. अशावेळी रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे सावंतवाडीत तातडीने (ALS) ऍम्ब्युलन्स देण्यात यावी याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची भेट घेउन तसे पत्र देण्यात आले. यावेळी देव्या सूर्याजी, मंगेश तळवणेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते