सावंतवाडी /प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यातील बांदा, निरवडे, सांगेली, देवसू या चार ग्रामपंचायती पैकी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. बांदा, देवसू या दोन ठिकाणी भाजप तर निरवडे, सांगेली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बांदामध्ये राजाराम सावंत, निरवडेमध्ये हरी वारंग, सांगेलीमध्ये श्रीधर लाड, देवसूमध्ये किसन सावंत हे विजयी झाले आहेत