दोडामार्ग – वार्ताहर:
सावंतवाडी ते भेकुर्ली ही एसटी बस बंद असून ती सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. सावंतवाडी बसस्थानकातून संध्याकाळी 4 वाजता कुडासे मार्गे भेकुर्लीला वस्तीला ही एसटी बस येत होती. त्यानंतर सकाळी 5.30 वाजता ही पुन्हा सावंतवाडीला जात होती. त्यामुळे बऱ्याच ग्रामस्थांना या बसचा फायदा होत होता. मात्र गेल्या लॉकडाऊन काळापासून ही फेरी बंद आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ही बस सूरु करण्याची मागणी विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी केली आहे.