नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती : पुतळय़ासाठी 55 लाखाची तरतूद : कारिवडे येथे शिवजयंती साजरी
वार्ताहर / सावंतवाडी:
शहरात भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळय़ासाठी जागाही निश्चित केली आहे. 55 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या मेपर्यंत दोन महिन्यात सावंतवाडीत शिवपुतळा उभारण्यात येईल. हा पुतळा सावंतवाडीबरोबर नजीकच्या कारिवडे, माजगाव, चराठे, कोलगाव गावांना भूषणावह ठरेल, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी कारिवडे गावठणवाडी येथील कुळकर कला क्रीडा मंडळाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले.
कारिवडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवपुतळय़ास हार अर्पण केला. कारिवडेत भव्य शिवरॅली काढण्यात आली. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी आमुणेकर, नाना गावडे, लोकेश परब, मुन्ना कारिवडेकर, पांडुरंग कारिवडेकर, काशिराम सावंत, संतोष परब, शैलेश गावडे, सुदीप गावडे, धीरज परब, सचिन सावंत, रामचंद्र परब, प्रथमेश परब, समीर मेस्त्राr, सुशील आमोणेकर, बंटी आमुणेकर, नितीन गावडे, साईल, हेमंत बांदेकर, चारुदत्त गावडे उपस्थित होते.
परब म्हणाले, सावंतवाडी शहरालगत कारिवडे गाव आहे. हा गाव विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. या गावाकडे विशेष लक्ष देईन. कारिवडेवासीयांचा सावंतवाडी शहरात सन्मान राखला जाईल. मला कधीही हाक मारा, मी तुमचा हक्काचा आहे, असेही ते म्हणाले.