वार्ताहर/ सावईवेरे
सावईवेरे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या 24 तासांच्या सार्वजनिक भजनी सप्ताहाला काल शनिवारी दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. पुरोहित घनश्याम साने व प्रकाश अभिषेकी यांच्याहस्ते धार्मिक विधी पार पडल्यानंतर पारंपरिक समई प्रज्ज्वलीत करुन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
गायक कलाकार संदेश खेडेकर, गौरांग भांडये, गजानन सावईकर व अन्य कलाकारांनी भजनी पारांना सुरुवात केली. त्यांना हार्मोनियमवर बाबुराव भांडये तर पखवाजवर निलेश भांडये यांनी साथसंगत केली. त्यानंतर गावातील विविध वाडय़ांवरील भजनी पार सादर करण्यात आले. रात्री श्री अनंत देवस्थान ते शांतादुर्गा देवस्थानपर्यंत चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. आज रविवार 7 रोजी दुपारी 12 वा. या भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.