वाळवा / वार्ताहर
बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीचा छळ करून, अमानुष मारहान करुन खुन केल्याची दुःखद घटना वाळवा येथे गुरुवारी सकाळी घडली आहे. सुहाना ख्वाजासाहेब मोमीन (वय-१२ रा. श्रमिक नगर वाळवा ) असे त्या अभागी मुलीचे नाव असुन, सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन (वय ३५) हिच्या साथीने ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन (वय ४०) याने त्या मुलीचा निर्दयीपणे लाथा बुक्क्या मारून, फरशीवर डोके आपटुन खुन केला, सावत्र आई व बापाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याच्या पहील्या पत्नीची सुहाना ही मुलगी आहे. दोन वर्षापुर्वी सुहानाच्या आईचा मृत्यु झाला, त्यानंतर ख्वाजासाहेब याने आसमाशी विवाह केला व तेव्हापासुन सावत्रपणाची वागणुक देत सुहानाचा छळ पती पत्नींनी सुरू केला होता. घरातील सर्व घरकामे सुहानाकडुन करून घेतली जायची, पण तरीही तिला शिवीगाळ करीत आमनुष मारहान केली जायची, तिची शाळा सुद्धा बापाने बंद केली. दुसऱ्या लग्नानंतर काही दिवसातच पलुस येथे मदरशामध्ये बापाने तिला पाठवले, दुसरी पत्नी आसमा हिला सात – आठ महीन्यापुर्वी मुलगा झाला, त्यामुळे सुहानाला घरकामसाठी परत वाळवा येथे आणले होते.
काल बुधवारच्या रात्री पती पत्नी यांनी लाथाबुक्कयांनी तिला बेदम मारहान केली, शेजारच्या लोकांनी हस्तक्षेप केला असता माझी मुलगी आहे. मी काहीपण करीन, तुम्हाला काय करायचे ? असा दम त्याने भरला होता, लाथा बुक्क्या मारून, फरशीवर डोके आपटुन तिचा खुन केला, सुहानाचा मृतदेह अंथरुनामध्ये तसाच ठेऊन ख्वाजासाहेब गुरुवारी सकाळी द्राक्षबागेत मजुरीच्या कामावर निघुन गेला, आसमाने सकाळी पतीला फोन केला, तो आल्यानंतर सुहाना मृत झाल्याचे त्याने परिसरातील लोकांना सांगीतले, स्थानिक नागरीक व शेजारच्या लोकांनी ख्वाजासाबला चांगलाच चोप दिला, मयत झालेल्या मुली प्रमाणेच ख्वाजासाब याने पहील्या पत्नीलाही अतोनात छळले होते, अशी घटनास्थळावर चर्चा होती, पोलीसांना लगेच पाचारन करणेत आले. आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले, पोलीस पंचनामा करून उत्तरीय तपासनीसाठी मृतदेह आष्टा उपजिल्हा रुग्णालय येथे नेला, आरोपी पती, पत्नीलाही पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वीरूपाक्ष कुंभार करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावकरी व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात वाळवा माळभाग येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करणेत आले, सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असुन, परिसरातील लोक संताप व्यक्त करीत आहेत. आरोपी पती, पत्नीला कठोर शासन व्हावे अशी मागणी होत आहे.