कार्यकर्ते – समर्थकांकडून आनंद, विजयासाठी झटण्याचा निर्धार
प्रतिनिधी /कुडचडे
सावर्डेत भाजपची उमेदवारी माजी आमदार गणेश गावकर यांना जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथ व प्रभागात फटाके वाजवून जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत करण्यात केले. भाजप पक्षश्रे÷ाrंनी सावर्डेतील मतदारांच्या अपेक्षांची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांना दिलासा दिल्याबद्दल पक्षाचे आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे व कायमस्वरूपी पक्षाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
सावर्डे मतदारसंघात भाजपचा आमदार परत जिंकून आणण्यासाठी रात्रंदिवस वावरणार अशी प्रतिक्रिया ज्ये÷ कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज सावर्डेत आनंदाचा क्षण असून यंदा आम्ही युवक एकत्र राहून गणेश गावकर यांना पूर्ण पाठिंबा दर्शवून त्यांच्या नेतृत्वाला उभारी देणार, असे त्यांच्या युवा समर्थकांनी सांगितले.
श्री. गावकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सावर्डे मतदारसंघातील एकंदर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर धनगर समाज, शेतकरी वर्ग तसेच एसटी, ओबीसी समाजातील कित्येक मतदारांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या व पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे व धारबांदोडा येथे लवकरच उमेदवार गणेश गावकर यांच्या नवीन कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री मतदारसंघाचा दौरा करणार असून धडे, मीराबाग तसेच अन्य ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई व अन्य पदाधिकाऱयांची उपस्थिती लाभणार आहे.