घेतलेली लिफ्ट जीवघेणी ठरल्याचे उघड, काकोडा येथे राहणाऱया संशयित आरोपीला अटक
प्रतिनिधी/ कुडचडे
रूपा शेट पारकर या महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर नवव्या दिवशी ठोस पुराव्यांसह मूळ कर्नाटकातील, पण सध्या काकोडा, कुडचडे येथे राहणाऱया हुसेन कासिम खान (वय 40 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तो पेशाने चालक असून चौकशीच्या दरम्यान संशयित आरोपीने सदर खून सोन्याच्या मोहापोटी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी कुडचडे पोलीस स्थानकात पत्रकारांना दिली. यात उपअधीक्षक संतोष देसाई व इतर सर्व संबंधित निरीक्षकांनी चांगली कामगिरी बजाविल्यामुळे लवकरात लवकर खुन्यापर्यंत पोहोचण्यात यश प्राप्त झाले, असे त्यांनी सांगितले.
गुड्डेमळ, गांधीनगर-सावर्डे येथे 6 मे रोजी एका वृद्ध महिलेचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी आढळून आला होता. त्यानंतर सदर मृतदेह रूपा सुधाकर शेट पारकर (वय 54) या करमणे, दाभाळ येथील रहिवासी असलेल्या महिलेचा असल्याचे उघड झाले होते. शवचिकित्सेत हा खून असून तिचा मृत्यू डोक्मयावर जोरदार प्रहार झाल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होताच गुन्हा अन्वेषण विभागाच्या सोबत कुडचडे, केपे, सांगे व कुंकळ्ळी निरीक्षकांच्या सहकार्याने तपास सुरू करण्यात आला होता.
या तपासाच्या अंतर्गत गेल्या सहा दिवसांत 50 हून जास्त संशयितांच्या जबान्या घेण्यात आल्या व सीसी टीव्ही फुटेजही तपासून पाहण्यात आली. त्यात बऱयाच संशयास्पद गोष्टींची माहिती प्राप्त झाली व त्याच्या आधारे नियुक्त टीमच्या सहकार्याने राबविलेल्या शोध मोहिमेत मयत पारकर हिचा मोबाईल खून झालेल्या परिसरात सापडला. त्यातून सायबर तपासाच्या अंतर्गत पुरावे मिळत गेले व शेवटी संशयित आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले, असे अधीक्षक धनिया यांनी सांगितले.
लिफ्ट पडली महागात
मयत रूपा पारकर ही कुडचडे, केपे, सांगे व इतर भागांत फरसाण व अन्य गावठी खाद्यपदार्थ विकायची व कित्येक वेळा वेळेवर घरी जाण्यासाठी बस मिळत नसल्यामुळे रस्त्याने जात असलेल्या गाडय़ांना हात दाखवून लिफ्ट घेऊन जायची. त्याचप्रमाणे 5 मे रोजी ही महिला दुपारी सदर रस्त्यावर लिफ्ट घेण्यासाठी उभी होती. त्यावेळेस संशयित आरोपी हुसेन, जो आपल्या गोदाममधून पुढे जात होता, त्याला तिने लिफ्टसाठी हात दाखविला. त्यामुळे हुसेनने जरा पुढे जाऊन आपली सुमो गाडी फिरवली आणि तिला लिफ्ट दिली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सोन्याच्या मोहाने खून
त्यावेळेस हुसेनने तिच्या गळय़ातील सोन्याची साखळी बघितली व एकटी महिला असल्याने तिचा फायदा घेण्याचे ठरविले. थोडे दूर गेल्यावर रूपा ही तिच्या मोबाईलवर बोलत असताना संधी साधून गाडीचा टायर तपासून पाहण्याचे निमित्त करून तो खाली उतरला व तिच्या डोक्मयावर पाठीमागून लोखंडी सळीने वार केला. त्यात रूपा ही बेशुद्ध झाली. त्यानंतर संशयित आरोपीने तिच्या गळय़ातील सोन्याची साखळी काढली व तिला गुड्डेमळ येथे फेकले. तेथेच जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
मोबाईल सापडल्याने तपासाला गती
हा प्रकार खुनाचा असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासकार्य सुरू केले. यात कित्येक संशयितांच्या जबान्या घेण्यात आल्या. त्यातून बऱयाच गोष्टी पोलिसांना समजल्या. हुसेन ज्या वेळेस रूपा शेट पारकर हिला फेकण्यासाठी गुड्डेमळ येथे येत होता त्यावेळेस तिचा मोबाईल परत परत वाजत असल्यामुळे त्याने तो मोबाईल रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात फेकला. पण सदर मोबाईल जास्त दूर फेकला गेला नसल्यामुळे तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आला व संशयित आरोपीला अटक करण्याच्या बाबतीत सायबर गुन्हे विभागाची मदत झाली.
सोनसाखळी तारण ठेवून कर्ज काढले
संशयित आरोपी हुसेन याने रूपा हिला फेकून दिल्यानंतर तिच्या गळय़ातील सोनसाखळी घेऊन तो मुथ्थूट फायनान्समध्ये गेला आणि तिथे अंदाजे 40 ग्रॅमची सदर सोनसाखळा तारण ठेवून त्याने कर्ज घेतले. त्या पैशांतून त्याने अन्य एक कर्ज फेडले व नवीन दुचाकीही घेतली, असे तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती अधीक्षक धनिया यांनी दिली.
सीसी टीव्ही कॅमेरे बसवा
सध्या विविध प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुकानदार, अन्य व्यापाऱयांनी आपापल्या आस्थापनात सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्यास अशा घटनांचे प्रमाण कमी होण्याची शक्मयता आहे. गुन्हे घडले, तरी त्यांचा छडा लावण्याच्या बाबतीत या प्रणालीचा भरपूर फायदा होतो आणि पोलिसांना मदत होते, असे यावेळी अधीक्षक धनिया यांनी सांगितले.