काकोडा/वार्ताहर
सावर्डे ग्राम पंचायतीच्या उप सरपंचपदी कापशे सावर्डे या प्रभाग क्रमांक 5 च्या पंच सदस्य सौ तेजा गोकुळदास नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अलिखित करारानुसार ऑगस्ट महिन्यात उप सरपंच श्रेया तारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर सदर पद रिक्त होते.
उप सरपंचपदासाठी सौ तेजा नाईक यांचे नाव पंच सदस्य तथा यापूर्वी उपसरपंच भूषवलेल्या सौ श्रेया तारी यांनी सुचवले तर सुमित्रा नाईक यांनी अनुमोदन दिले. यावेळी सरपंच संदीप पाऊसकर, पंच सदस्य संजय नाईक, उल्हास नाईक, अमेय नाईक व नितेश भंडारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सौ तेजा नाईक यांनी आपण उप सरपंच पदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निर्वाचन अधिकारी म्हणून हेमंत कुर्डीकर यांनी काम पाहिले.