ग्रामस्थांची आंदोलनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे मूळ गाव असलेल्या सावळगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) गावाला तालुक्मयाचा दर्जा द्या, अशी मागणी सावळगी ग्रामस्थांनी मंगळवारी विधानसौधसमोर आंदोलन छेडून केली आहे.
सावळगी गावची लोकसंख्या 1 लाख 24 हजार इतकी आहे. गावात बाजारपेठ, पोलीस स्थानक, तहसीलदार कार्यालय, रयत संपर्क केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह शासनाची विविध कार्यालये आहेत. याबरोबरच पदवीपूर्व कॉलेज, आयटीआय कॉलेजही आहे. त्यामुळे गावचा विकास झाला असून इतर लहानसहान खेडय़ांतील लोकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी सावळगी गावाला तालुक्मयाचा दर्जा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावळगी हे जिल्हय़ाच्या ठिकाणापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शासकीय कागदपत्रांसह इतर कामांसाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील कित्येक दिवसांपासून सावळगीला तालुक्मयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. मात्र, आजवर याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या आणि इतर जवळच्या खेडय़ांचा विचार करून सावळगीला तालुक्मयाचा दर्जा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.