वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी तालुक्यातील सावळगी तालुका केंद्र करण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत असून अद्याप तालुका केंद्र करण्याची घोषणा करण्यात न ल्याचा निषेध म्हणून आगामी ग्राम पंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सावळगी सार्वजनिक सभेत ग्राम प्रमुखांनी घेतला.
सावळगी तालुका केंद्र करण्याची मागणी गेल्या 70 वर्षाची असून अनेक तालुक्यांची रचना झाली तरी सावळगी मात्र अद्याप तालुका दर्जा मिळाला नसल्याने ग्राम पंचायत निवडणुकीसह येणाऱया पुढील सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ईशारा देण्यात आला. या सभेस अप्पूगौडा पाटील, बसवराज परमगोंड, सुशिल कुमार बेळगली, सुभाप्पा पाटोळे, विठ्ठल उमराणी, सतगौडा न्यामगौड आदी उपस्थित होते.