रुग्णसंख्या वाढल्यास तुये येथील नवीन इस्पितळातही केअर सेंटर सुरु करण्यात येणार : आमदार दयानंद सोपटे
प्रतिनिधी / पेडणे
पेडणे सावळवाडा येथील इनडोअर स्टेडीयम कोरोना केअर सेंटर साठी सरकारने ताब्यात घेतला आहे . या सेंटर मध्ये एकूण 150 खाटांची सोय करता येते . सध्या 100 खाटांची सोय केली जाईल . अशी माहिती मांदेचे मतदारासंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी पेडणे सावळवाडा येथील इनडोअर स्टेडीयमची रविवारी 19 रोजी पाहणी केल्यानंतर स्थानिक पत्रकाराना माहिती देताना सांगितले .
मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांनी 12 रोजी या इंडोर स्टेडीयमची पाहणी करतेवेळी पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर , पेडणे उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई , पर्यटन विकास महामंडळ संचालक बाबी उर्फ विश्वनाथ तिरोडकर , माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई ,आदी उपस्थित होते .
आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी माहिती देताना सावळ वाडा परिसरातील स्थानिक नागरिकांच्या काही अडचणी आणि कोरोना सेंटर झाले तर भीती निर्माण झाली होती . आपण स्थानिकांना विश्वासात घेवून त्यांच्या मनातील भीती दूर करताना त्यांनी काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्याचे स्वागत करण्यात आले आहे .
स्थानिक नागरिकांनी भिण्याचे कारण नाहीः आमदार सोपटे
येथील नागरिकांच्या म्हणण्या नुसार या ठिकाणी कोरोना सेंटर केले तर कोरोना रुग्ण सर्वत्र बाहेर फिरतील अशी भीती आहे . या विषयी आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले कि ज्या मुख्य दोन गेट्स आहे त्या गेट्स बंद करून त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे विरोध करणे योग्य नव्हे : उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई
पेडणे तालुक्मयात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने याठिकाणी कोरोना सेंटर करण्यासाठी विरोध करणे योग्य नसल्याचे स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांनी सांगितले . कोरोना रुग्ण या ठिकाणी ठेवल्यास त्यांचा संसर्ग हा स्थानिकांना होईल अशी भिती सुरुवातीला वाटत होती.म्हणून आपला याठिकाणी कोरोना केअर सेंटर करण्यासाठी विरोधा होता.माञ आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारचा ञास होणार नसल्याचे सांगितले .तसेच ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्यामुळे ते रुग्ण बाहेर फिरणार नाही असे स्पष्ट केले असल्याचे गजानन सावळ देसाई यांनी सांगितले .
पुरुष वा महिलांचा वेगळा विभाग
इनडोअर स्टेडीयम मध्ये सध्या 100 खाटांची सोय करण्यात येणार आहे . त्यासाठी स्टेडीयम मध्ये पार्टिशन घालून एका बाजूने 50 महिला व दुसऱया बाजूने 59 पुरुष रुग्णाची सोय केली जाईल . येत्या चार दिवसापासून हे कोरोना सेंटर चालू केले जाईल असे आमदार सोपटे यांनी सांगितले .
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी . वाढत्या रुग्णामुळे पेडणे तालुक्मयात कोरोना सेटरची गरज होती , ती गरज ओळखून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत , आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तातडीची पाऊले उचलून हि सोय केली त्याबद्दल आमदार सोपटे यांनी समाधान व्यक्त करत आरोग्य मंञी आणि मुख्यमंञी यांना धन्यवाद दिले.
जर गरज भासल्यास तुये येथेही कोरोना केअर सेंटर करणार : आमदार दयानंद सोपटे
आमदार सोपटे म्हणाले सावळवाडा येथे 150. रुग्णांची सोय होणार अशी व्यवस्था केली जाणार आहे.माञ जर पेडणे तालुक्मयात रुग्णसंख्य वाढली तर तुये थेथील नव्याने बांधण्यात आलेल्या इस्पितळ इमारतीत अजून एक कोरोना सेंटर बनविण्यात येईल.यासंबंधी आरोग्य मंञी विश्वजीत राणे तसेच मुख्यमंञी डाॕ.प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती सोपटे यांनी दिली.
आमदार सोपटे यांच्याकडून मंत्री आजगावकर यांचे कौतुक
पेडणे तालुक्मयात कोरोना महामारीच्या संकटात मिळत असलेली वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन पेडणे मतदार संघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी पेडणे येथील सावळवाडा इनडोअर स्टेडियम मध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेत सरकार दरबारी प्रयत्न केला. त्यामुळेच सावळवाडा येथील कोरोना केअर सेंटर करण्यासाठी आरोग्यमंञी आणि मुख्यमंञी यांनी मान्यता दिली. त्याबद्दल मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांना धन्यवाद दिले.