प्रतिनिधी / पर्वरी
सावळे पिळर्ण येथील श्री महारुद्र आमेकरनाथ देवस्थानच्या प्रागंणात वर्धापनदिन प्रित्यर्थ अखिल गोवा नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा श्री देवानंद अर्जुन नाईक याने पुरस्कृत केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा साळगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. जयेश साळगावकर, देवानंद नाईक, रेईश मागुसचे जिल्हा सदस्य रुपेश नाईक, पिळर्ण गावचे सरपंच संदिप बांदोडकर, पंच सदस्य अमरनाथ गोवेकर यांच्या देवस्थानचे अध्यक्ष योगानंद नाईक व विठ्ठल रखुमाईचे अध्यक्ष विलास सावळेकर उपस्थित होते.
दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुलांना प्रोत्साहन देणारी सर्व मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अरुण नागवेकर यांनी केले. बक्षिसे मिळालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे आहेत. पहिल बक्षिस कन्या नाईक, दुसरे रुद्राक्ष नाईक, तिसरे साई सरकार व उत्तेजनार्थ बक्षिस ज्योया किल्लेदार हिने पटकाविले.