वार्ताहर /पणजी
सावळे – पिळर्ण येथील श्री महारुद्र आमेकरनाथ देवस्थानचा अकरावा वर्धापनदिन गुरुवार दि. 24 ते 1 मार्च रोजी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 24 रोजी स. 8 वा. यजमानाची शरीर शुध्दी देवता, प्रार्थना, गणेशपूजन स्वस्तीवाचन, मातृकापूजन नांदी श्राध्द, आर्चायवरण, प्रकार शुध्दी, मुख्य देवता स्थापना, अग्नी स्थापना, ग्रहयज्ञ, रुद्रस्वाहाकार, उत्तरांग होम बलीदान, पुर्णाहुती, अभिषेक, ब्राम्हण संभावना, आशर्वाद, महागाहाणे, तिर्थमहाप्रसाद.
वर्धापनदिनाचे यजमान सौ. व श्री. चेतन सावळेकर सौ. व श्री. प्रेमानंद शिरोडकर सौ. व श्री. प्रदीप शिरोडकर, सौ. व श्री. कमलाकांत कळंगुटकर, सौ. व श्री. विजेश सावळेकर दु. 1 वा. महाप्रसाद सुरु होईल.
शुक्रवार दि. 25 रोजी स. 8 वा. नित्यपूजा, आरती व संध्याकाळी 7 वाजता ह.भ.प. श्री. गुरुदास सुतार (खडकी सत्तरी याचे) किर्तन. संगीतसाथ विठ्ठल खांडोळकर व पुंडलिक कळगुंटकर. शनिवार 26 रोजी स. 8 वा. नित्यपूजा, आरती व संध्याकाळी 7 वाजता ‘अखिल गोवा नत्य स्पर्धा’ (वय गट – 7 ते 12 वर्ष) रविवार 27 रोजी स. 8 वा. नित्यपूजा, आरती व संध्याकाळी 7 वाजता साई बोडगेश्वर मंडळ म्हापसा घुमट आरती. सोमवार 28 स. 8 वा. नित्यपूजा, आरती व संध्याकाळी 7 वाजता वैभवी क्रियेशन डिचोली निर्मित आणी अमर फाळकर प्रस्तुत मराठी नाटक ‘जीव रंगला तुझ्यात’ मंगलवार 1 मार्च रोजी ‘महाशिवरात्री’ पुजेचे यजमान ः शांती सदानंद नागवेकर. विशेष सुचना ः महाशिवरात्री दिवशी सर्व भक्तगणांना गर्भकुडीत अभिषेक करण्यासाठी प्रवेश देण्यात येईल. (वेळ सकाळी ः 4.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) संध्याकाळी 7 वाजता श्री गुरुकृपा संगीत संस्था तांबोसे, पेडणे. सहर्ष सादर करीत आहेत महान पर्पोराणीक नाटक ‘जय जय गौरी शंकर’’ अधिक माहितीसाठी योगानंद नाईक 9158381896 यांच्याशी संपर्क साधावा.