सविता कुंभार यांचे प्रतिपादन : निपाणीत फुले यांची जयंती
प्रतिनिधी/ निपाणी
स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्यावतीने बालोद्यान आश्रममध्ये सावित्रीबाई फुले जयंती व अन्नदान कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी सविता कुंभार मिसेस युनिव्हर्स हॉनेसट 2020 व अध्यक्ष अजित माने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सविता कुंभार यांनी, स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा मनात पहिलं नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी 19 व्या शतकात शिक्षणाचा पाया घातला. सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे भेदभाव होते. अशावेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजित माने यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी श्रीकांत मानवर, निवास कुरणे, दिपक कांबळे, सुहास कुरणे, अभिषेक सनदी, नामदेव कांबळे, दिपक वराळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.