क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
शापोरा प्रीमियर लीग टी-10 क्रिकेट स्पर्धेत सावित्री ब्लास्टर्स, मॅन्शन चॅलेंजर्स आणि महेश युनायटेड संघाने शानदार विजय नोंदविले. शापोरा पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सावित्री ब्लास्टर्सने नोबल स्ट्रायकर्सचा 9 विकेट्सनी पराभव केला. दुसऱया लढतीत मॅन्शन चॅलेंजर्सने अंजुणा चॅम्प्सला 61 धावानी तर महेश युनायटेड संघाने नोबल स्ट्रायकर्स संघाला 8 विकेट्सनी पराभूत केले.
संक्षिप्त धावफलकः नोबल स्ट्रायकर्स, 10 षटकात 8 बाद 84 (सॅड्रिक फर्नांडिस 17, शुबेंदू गोवेकर 30, आशुतोष रेवोडकर 12 धावा. गणेश फडते 1-18, रुपेश गावस 2-18, साईश पेडणेकर 2-10) पराभूत विरूद्ध सावित्री ब्लास्टर्स, 7.3 षटकात 1 बाद 87 (गणेश फडते 30, राहुल बांदोडकर 16, साईश पेडणेकर नाबाद 31 धावा. सोमा कोरगावकर 1-26). सामनावीर- साईश पेडणेकर (सावित्री ब्लास्टर्स).
मॅन्शन चॅलेंजर्स, 10 षटकात 6 बाद 123 (मयुर बांदोडकर 11, रोहन चौहान 32, उदेश सावंत 14, नीलेश नागवेकर 24 धावा. स्वप्नील कांदोळकर 2-14, चेतन मोरजकर व रुपेश पोपकर प्रत्येकी एक बळी) विजयी विरूद्ध अंजुणा चॅम्पस, 9.4 षटकात सर्वबाद 62 (रुपेश पोपकर 10, अक्षय मांद्रेकर 19 धावा. नीलेश नागवेकर 2-4, रोहन चौहान 2-20, शाम कळंगूटकर 2-16, जयेश हरमलकर 2-11). सामनावीर – नीलेश नागवेकर (मॅन्शन चॅलेंजर्स).
नोबल स्ट्रायकर्स, 10 षटकात 9 बाद 70 (सॅड्रिक फर्नांडिस 21, सोमा कोरगावकर 10, शुबेंदू गोवेकर 13 धावा. कौशिक पेडणेकर 3-15, प्रदोष वाळके 4-12) पराभूत विरूद्ध महेश युनायटेड, 6.4 षटकात 2 बाद 74 प्रदोष वाळके 15, समीर हरमलकर 15, कौशिक पेडणेकर नाबाद 20, वॅन्सी सिल्वेरा नाबाद 14 धावा. देवानंद मांद्रेकर 1-14, ब्रायन कुरैया 1-13). सामनावीर – प्रदोष वाळके (महेश युनायटेड).