वारणानगर / प्रतिनिधी
सावित्री महिला औद्योगिक संस्थेने प्रगतीचे वेगवेगळे टप्पे गाठले असून येणाऱ्या काळात शासनाच्या एमएसएमईच्या अंतर्गत अत्याधुनिक पॅकेजिंग क्लस्टर योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याची घोषणा वारणा समुहाचे प्रमुख डॉ विनय कोरे यांनी केली. तात्यासाहेब कोरेनगर ता. पन्हाळा येथे महिला दिनाचे औचित्य साधून सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी कोरे होत्या.
यावेळी कोरे म्हणाले, काळानुरुप बदलानुसार महिला वर्गाने सामोरे जाण्याची गरज आहे. सावित्री महिला औद्योगिक संस्थेनेअडचणीच्या काळात प्रगतीचा टप्पा गाठला आहे यासाठी महिलासह सर्व कामगारांनी मोठे परिश्रम घेतले आहे केंद्र शासनाच्या सहकार नंदीनी योजनेत सावित्री महिला औद्योगिक संस्थेचा सहभाग घेण्याचा प्रयत्न चालू असून लवकरच त्याला यश मिळेल.
प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहीती दिली अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी संस्थेने अडचणीवर मात करत ५कोटींची उलाढाल केली असून भाविष्यात ही संस्था राज्यात नावारूपास आणण्याचा मानस असल्याचे सांगितले वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर म्हणाले, संस्था अडचणीत असताना संचालक मंडळाने काटकसर करून व महिला पुरूष कर्मचाऱ्यांने योगदान दिल्याने संस्थेला ५० लाखांचा नफा मिळाला भविष्यात नवीन यंत्रसामुग्री आणून संस्था आणखीन नफ्यात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव, संचालक शिवाजी मोरे, माधव गुळवणी, शिवाजी जंगम, दिपक पाटील अॅड एन आर पाटील, व्ही.टी. पाटील, महेंद्र शिंदे, चंद्रशेखर बुवा , शमशाद मुल्ला, वारणा बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, अनिल हेर्ले, डॉ.अशोक पाटील, श्रीधर बुधाळे, शरद शेटे, मोहन जाधव, उत्तम कणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.