वार्ताहर / टोप
बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित सावे ता. शाहूवाडी येथील अशोकराव माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालय ने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मध्ये विद्यार्थी चे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता वेगवेगळी अॅप्लिकेशन चा नियमित वापर करत आहेत, या अॅप्लिकेशन चा उपयोग विद्यार्थी अभ्यासक्रमात व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावा याकरिता महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग लॅाकडाउन नंतर विडिओ कॉन्फरेन्स मार्फत ऑनलाईन लेक्चर घेत आहेत.
अभ्यासक्रम नियमित चालू राहावा, विद्यार्थ्यांचा सराव नियमित व्हावा याकरिता महाविद्यालय ने हा उपक्रम सुरु केला आहे. अशी माहिती महाविद्यालय चे प्राचार्य डॉ अभिजीत शशिकांत कुलकर्णी यांनी दिली. प्रश्नाचे शंका निरसन, अभ्यास क्रम मधील अडचणी दूर करायचे काम सुद्धा शिक्षक वर्ग नियमित करत आहेत. प्राचार्य डॉ अभिजीत कुलकर्णी यांनी झूम या अॅपद्वारे ऑनलाईन एप्लिकेशन बद्दल संपूर्ण माहिती दिली.विद्यार्थीच्या प्रगतीसाठी व नवीन ऑनलाईन शैक्षणिक उपक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने ,कार्याध्यक्ष विकासराव माने व जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने यांचे मार्गदर्शन लाभले.