प्रतिनिधी / रत्नागिरी
सडामिऱया येथे सासरी आलेल्या महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या प्रकरणाची फिर्याद स्वप्नाली सुकांत सावंत (32, ऱा तरवळ-सुतारवाडी, रत्नागिरी) यांनी दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या सासरी सडामिऱया येथे मंगळवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास गेल्या होत्य़ा सासरच्या घरानजीकच्या असणाऱया नवलाई मंदिरामध्ये आपल्या 4 वर्षाच्या मुलीसह दर्शन घेवून परत येत असताना संशयित पूजा सुकांत सावंत (ऱा सडामिऱया, रत्नागिरी) यांनी फिर्यादीच्या गाडीवर लाथ मारली व जीविताला व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य केल़े तसेच फिर्यादीच्या मुलीला पाडण्याचा प्रयत्न केला व अश्लिल शिवीगाळ करत गावात पुन्हा पाऊल ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिल़ी या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत़