केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला किस्सा
वृत्तसंस्था /गुरुग्राम
देशभरात महामार्ग आणि उड्डाणपुलांचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी ओळखले जाते. स्पष्टवक्ते असणारे गडकरी प्रसंगी भाजप नेत्यांना देखील खडेबोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी गुरुवारी महत्त्वाचा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला आहे.
रस्त्याच्या कामात अडसर ठरत असल्याने गडकरींनी स्वतःच्या सासऱयांच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मंजुरी दिली होती. माझ्या सासऱयांचे घर रस्त्याच्या मध्ये येत होते. रामटेक येथे तो रस्ता तयार केला जात होता. पत्नीला न सांगता सासऱयाच्या घरावर बुलडोझर चालवून रस्ता केला. त्यावेळी वहिनींचे घर देखील इथेच कुठेतरी असल्याचे अधिकारी मला सांगत होते. रस्ता तयार करताना अडचण आली होती आणि ते घर तोडावे लागेल असे अधिकाऱयांनी सांगितले होते. राजकीय नेत्यांनी अतिक्रमणाला पाठिशी घालण्याचे पाप करू नये असे गडकरींनी हा किस्सा सांगत म्हटले आहे. हरियाणामध्ये गुरुवारी केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाची पाहणी केली आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासाठी सध्या 1450 किलोमीटरचे अंतर कापावे लागते. पण द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर 1250 किलोमीटरवर येणार आहे.