प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी रात्री सौंदत्तीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात सौंदत्ती पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झाला. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
यल्लाप्पा रामाप्पा तळवार (वय 58) असे त्या दुर्दैवी पोलीस अधिकाऱयाचे नाव असून कोरोना बंदोबस्त आटोपून आपल्या मोटारसायकलवरून अनिगोळ, ता. बैलहोंगल येथील घरी जाताना मोटारसायकलला अपघात झाला आहे. केवळ दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. घटनेची माहिती समजताच मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडुविनमनी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जी. जी. चोप्रा कॉलेजजवळ हा अपघात घडला आहे.