वार्ताहर/ कारदगा
कारदगा येथील साहित्य विकास मंडळ यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अध्यक्षस्थानी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद होते.
प्रारंभी मंडळाच्या उपाध्यक्षा सुनिता कोगले-कदम यांनी स्वागत केले. तर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी प्रास्ताविकात साहित्य विकास मंडळ गेल्या 24 वर्षांपासून मराठी ग्रामीण साहित्य संमेलन भरवीत आहे. यंदाचे साहित्य संमेलनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. वर्षभर पूरक कार्यक्रम राबवून संमेलनाचे महत्त्व आणखीन गडद केले जाते. सत्कार समारंभ हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्ही. के. खोत, संजय बुडके, सुनिता कोगले-कदम, कुमार हेगडे, दादासो मुरारी, तर पत्रकार रंगराव बन्ने यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भाऊसाहेब चिंदके, प्रकाश काशीद, बाळासाहेब नाडगे, सुचित बुडके, कल्पना रायजाधव व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी तुकाराम गुणके, संजय अवघडी, संभाजी अलंकार, प्रशांत खराडे, विनोद परीट, संजय नवनाळे, प्रशांत कांबळे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते