संत गोरोबाकाका साहित्यनगरी उस्मानाबाद / संकेत कुलकर्णी
उस्मानाबादमधील संत गोरोबाकाका साहित्यनगरीत होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजेल. असे असले तरी या संमेलनात प्रामुख्याने बेळगाव सीमाप्रश्न या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव होऊ शकत, अशी चर्चा सध्या सारस्वतांमध्ये होताना दिसून येत आहे.
उस्मानाबादच्या संत गोरोबाकाका साहित्यनगरीत शनिवारी दिवसभर संमेलनात नक्की कुठले ठराव होणार ? याबाबतची चर्चा सुरू झाली. प्रतिवर्षी संमेलनामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणून संमेलनातील ठरावाकडे पाहिले जाते. यंदाही या संमेलनात बेळगाव सीमाप्रश्नाचा ठराव होईल आणि याबरोबरीने मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध होईल, अशी आशा मराठी भाषिक व सारस्वतांना आहे.