22 एप्रिल रोजी पार पडणार मोहीम
वृत्तसंस्था/ श्ऱीहरिकोटा
इस्रो यावेळी सिंगापूरच्या एका उपग्रहाला प्रक्षेपित करणार आहे. टीईएलईओएस-02 असे या उपग्रहाचे नाव असून याच्यासोबत आणखी काही उपग्रहांना अंतराळाच्या कक्षेत पाठविले जाणार आहे. 22 एप्रिल रोजी पार पडणाऱया या मोहिमेकरता इस्रो पीएसएलव्ही-सी55 या प्रक्षेपकाचा वापर करणार आहे.
हा प्रक्षेपक इस्रोचा सर्वात विश्वासार्ह रॉकेट राहिला आहे. सप्टेंबर 1993 मध्ये पहिल्यांदा या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत 56 वेळा या रॉकेटद्वारे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यंदा रॉकेटच्या इंटीग्रेशनमध्ये नवोन्मेष करण्यात आला आहे.
रॉकेटच्या असेंबलिंगमध्ये मोठा वेळ लागत होता, यावेळी इंटीग्रेशनमध्ये सुधारणा करत असेंबलिंग आणि उड्डाणात कमी वेळ लागेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी पीएसएलव्हीच्या सर्व हिस्स्यांना लाँचपॅडवर मोबाइल सर्व्हिस टॉवरद्वारे इंटीग्रेट केले जात होते म्हणजेच जोडले जात होते.
नव्या इनोव्हेटिव्ह पद्धतीद्वारे रॉकेटच्या पहिल्या आणि दुसऱया स्टेजला पीएसएलव्ही इंटीग्रेशन फॅसिलिटीमध्ये जोडले जाऊ लागले आहे. पीएसएलव्हीने आतापर्यंत 33 देशांचे 297 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. हा रॉकेट 44 मीटर उंच असून याचा व्यास 2.8 मीटर इतका आहे. याचे वजन 320 टन असून या रॉकेटचे चार व्हेरियंट्स आहेत.