ऑनलाईन टीम / सिंगापूर :
सिंगापूरच्या पंतप्रधानपदी ली सियेन लूंग तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. सिंगापूरमध्ये शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पीपल्स ॲक्शन पार्टीने सत्ता राखली आहे. तर विरोधक वर्कर्स पार्टीने संसदेच्या 10 जागांवर विजय मिळवला आहे.
सिंगापूरमध्ये 1965 पासून पीपल्स ॲक्शन पार्टी सत्तेत आहे. या पार्टीने संसदेतील 93 जागांपैकी 83 जागांवर विजय मिळवला. तर वर्कर्स पार्टीने 10 जागांवर विजय मिळवला आहे. भारतीय वंशाचे नेते प्रीतम सिंह यांच्या नेतृत्वाखालील विरोधी कामगार पक्षाने सेंगकाँगच्या जीआरसीसह या 10 जागा जिंकल्या आहेत. सेंगकाँगच्या जीआरसीमध्ये पंतप्रधान कार्यालयात मंत्री एन ची मेंग यांच्या नेतृत्वाखालील पीएपी टीमचा पराभव केला.
ली यांची आंग मो कियोच्या गट प्रेझेंटेशन कॉन्फरन्समधून (जीआरसी) पुन्हा निवड झाली. उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री हेंग स्वसी केल यांचीही फेरनिवड झाली. तर वर्क्सर्स पार्टीचे भारतीय वंशाचे सरचिटणीस प्रितम सिंग यांना संसदेतील विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्त केले जाईल, अशी ग्वाहीही ली यांनी दिली.