नवी दिल्ली
जागतिक बदलाच्या वातावरणाला अनुसरून सिंगापूरमधील इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म शॉपी यांनी आपला भारतातील गाशा गुंडाळला असल्याचे कळते. डिसेंबर 2021 मध्ये इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म शॉपीची स्थापना भारतात करण्यात आली होती. पण जागतिक बाजाराची डळमळीत अवस्था, तसेच व्यापारी संघटनांकडून होणाऱया विरोधाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने देशातला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. भारतातच यांना अंतर्गत विरोध होतोय, असे ऐकायला मिळते.