वॉरसॉव्ह
चीन आणि दक्षिण कोरियात सध्याला कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत जरी वाढ होत असली तरी जगभरातील इतर देशांमध्ये कोरोना संदर्भातील निर्बंध मागे घेण्याची पावले उचलली जात आहेत. सिंगापूर नंतर आता पोलंड सरकारनेही कोरोना महामारीशी संबंधित निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर सर्व निर्बंध उठवणारा पहिला देश ठरला आहे. पोलंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून परिस्थितीचा आढावा घेऊनच सरकारने निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने यासंबंधीची घोषणा शुक्रवारी केली आहे. काही ठराविक ठिकाणीच मास्क घालण्यासंबंधीची सक्ती मागे घेतली आहे. कोरोनाशी निगडीत असे होम क्वारंटाईन, आयसोलेशन यासारखे नियमही आता मागे घेण्यात आले आहेत. एका नियमामध्ये मास्क घालण्याची सक्ती नसणार असून आरोग्य कर्मचाऱयांना मात्र मास्क हा घालावाच लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पोलंडमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱयांकरीताचे सर्व निर्बंधही उठवण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 24 फेब्रुवारीनंतर युपेन वरील हल्ल्यानंतर 20 लाख युपेनवासी नागरिक हॉलंडमध्ये दाखल झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.