ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सिंघु बॉर्डरवर तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांचे दोन पोलीस ऑफिसरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या कृषी कायद्याविरोधात मागील 16 दिवसांपासून सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करीत आहेत.
या दरम्यान, सिंघु बॉर्डरवर तैनात करण्यात आलेले एकप्र डीसीपी आणि एका अतिरिक्त डीसीपीला कोरोनाची लागण झाली आहे. सद्य स्थितीत दोन्ही पोलीस होम आयसोलेट झाले आहेत.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कालच दिल्ली पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना गुलाब आणि मास्क चे वाटप केले होते. तसेच शेतकऱ्यांना कोविड टेस्ट करून घेण्यासाठी विनंती केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी टेस्ट करून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले.