न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन : संपातील आशा उतरल्या अखेर रस्त्यावर
- मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना काळातही सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे काम करणाऱया आशांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. सीटू संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या झेंडय़ाखाली त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
आशा आणि गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱयांचा दर्जा द्या. महिना 18 ते 22 हजार वेतन द्या, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधत घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱयांना शिष्टमंडळाकडून निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, आंदोलन छेडणाऱयांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आशांवर भा. दं. वि. कलम 188. 269, 270, 143, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोरोना टेस्टिंगचे काम आशांवर लादण्यात येऊ नये. माझी जबाबदारी मोहिमेंतर्गतच्या तिसऱया टप्प्यातील कामाचा मोबदला निश्चित करून देण्यात यावा. पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग या बाबतच्या सर्वेक्षणाचा मोबदला देण्यात यावा. आरोग्य सेविका पदभरतीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना 50 टक्के आरक्षण मिळावे. मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर नियमितपणे पुरवावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीने 15 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. सिंधुदुर्गातील आशाही संपात उतरल्या आहेत. शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने छेडण्याची हाक राज्यस्तरीय संघटनेने दिली होती. त्यानुसार सिंधुदुर्गातही हे आंदोलन छेडण्यात आले.
सीटूचे राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तक फेडरेशन उपाध्यक्ष विजयाराणी पाटील, खजिनदार अर्चना धुरी यांच्यासह सुमारे 226 आशा वर्कर्स या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. �पेटला जास्तीत जास्त मुव्हमेंट मिळाण्यात यासाठी ही विदेशी कन्सेप्ट या पपेटमध्ये वापरल्याचे त्यांनी सांगितले. ही पपेटरी सादर करताना दर्शकांचे लक्ष केवळ आणि केवळ पपेटकडे राहावे, यासाठी पपेट सादर करणाऱयाला पूर्णपणे ब्लॅक ट्रेस कोड देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यू टय़ूब चॅनेलवरून हा ‘पपेट योगी’ आता जगभर पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. थोडक्यात सांगायचे, तर पपेटच्या माध्यमातून प्रथमच जगासमोर आलेला हा ‘योगी बाबा’ बच्चे कंपनीला योगाचा लळा लावेल हे निश्चित.