बेकायदा रेती वाहतूक करणाऱया ट्रक कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /पेडणे
सिंधुदुर्गातील बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे ट्रक पेडणे ट्रक मालक असोशिएशनने अडवून दिले पेडणे वाहतूक अधिकाऱयांकडे.सरकारने बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱया गोव्याबाहेरच्या रेतीच्या ट्रकवर कारवाई करण्याची मागणी पेडणे ट्रक मालक संघटनेने सरकारकडे केली आहे.
नईबाग येथील रेती व्यावसायिकांची काढलेली रेती सरकाररी यंञणेने परत जेसीबीच्या सहाय्याने गुरुवारी तेरेखोल नदी पात्रात फेकून दिली. या रेती व्यावसाय बेकायदेशीर असल्याचे वारंवार सराकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. नईबाग येथील रेतीवर कारवाई केली जाते, मात्र गोव्याबाहेरून येणाऱया रेतीच्या वाहूट्रकवर मात्र सरकारी यंत्रणा कुठल्याच प्रकारे कारवाई करत नसल्याने पेडणे ट्रक मालक संघटनेने शुक्रवारी सकाळी कुडाळ तसेच सिंधुदुर्गातून बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे ट्रक नईबाग येथे अडवून पेडणे वाहतूक अधिकाऱयांकडे सुपूर्द केले.
कुडाळ येथील बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱया ट्रकांवर कारवाई कराः मिलिंद शेटय़
यावेळी बोलताना पेडणे ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष राजमोहन शेटय़े म्हणाले की, पेडणेतील रेती व्यावसाय करणाऱया रेती व्यावसायिकांवर तसेच रेती वाहतूक करणाऱया ट्रकवर सरकारी यंञणा पोलीस, आरटीओ तसेच खनिज खाते, मामलेदार आणि इतर सरकारी यंत्रणा स्थानिकावर कारवाई करते, मात्र सिंधुदुर्गातील कुडाळ तसेच अन्य भागातून येणाऱया बेकायदेशीर वाहतूक करणाऱया ट्रकवर कारवाई करत नाही. पत्रादेवी येथे पोलीस तसेच आरटीओचे कार्यालय आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे परमीट तसेच पास नसताना हे गाडय़ा गोव्यात येतात. त्यावर नंबर पेल्टसुद्धा काही गाडय़ांवर नसते, माञ त्यांना पञादेवी येथे प्रवेश दिला जातो. कुडाळ येथील रेती ट्रकांवर कारवाई होत नसल्याने सरकारने या ट्रकवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मिलिंद शेटय़े यांनी केली.
बाहेरील गाडय़ांना सूट, आमाच्यावर कारवाईः रॉकी फर्नांडिस
यावेळी बोलताना ट्रक संटनेचे सदस्य तथा माजी सरपंच रॉकी फर्नांडिस म्हणाले, आम्ही बेकादेशीर रेती काढतो म्हणून पेडणे मामलेदार, मायनिंग विभागातर्फे कारवाई करुन रेती परत नदीत फेकली. मात्र कुडाळ आणि इतर भागातून येणाऱया बेकायदेशीर रेती ट्रकना सूट देते, त्यावर कारवाई होत नाही. सरकार दुजाभाव करत असून आम्हाला रेती व्यावसायाला सूट देऊन कायदेशीर रेतीसाठी परवाने द्यावेत आम्ही सरकारचे शुल्क भरण्यास तयार आहोत असे रॉकी फर्नाडिस यांनी सांगितले . यावेळी ट्रक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेटय़े, सचिव उत्कर्ष तेली, रॉकी फर्नांडिस, आनंद बांदेकर आदी उपस्थिती होते.