कणकवली विभागाची थकबाकी पावणेतीन कोटी, तर कुडाळची अडीच कोटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना बिले भरण्यास दिलेली सवलत : घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती, पथदीप, नळयोजना आदी वीज वापराचा समावेश
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना सवलत दिलेली आहे. महावितरणच्या सिंधुदुर्ग विभागाची थकबाकी जवळपास 5 कोटी 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती, स्ट्रीटलाईट, नळयोजना आदी वीज वापराचा यात समावेश आहे. कणकवली विभागाची थकबाकी 2 कोटी 75 लाख, तर कुडाळ विभागाची थकबाकी 2 कोटी 55 लाखांपर्यंत आहे.
सिंधुदुर्ग विभागात 2 लाख 21 हजारहून अधिक ग्राहक आहेत. यात कणकवली विभागात 1 लाख 6 हजार, कुडाळ विभागात 1 लाख 15 हजार ग्राहकांचा समावेश आहे. घरगुती ग्राहकांसह पथदीप बिलाची थकबाकीही मोठी आहे.
आचरा उपकेंद्र थकबाकी 31 लाख
आचरा सबस्टेशनमध्ये निवासी ग्राहक 11,180 असून त्यांच्याकडे 10 लाख थकबाकी आहे. वाणिज्यचे 864 ग्राहक असून त्यांच्याकडे 4 लाख 70 हजार, औद्योगिकचे 210 ग्राहक असून त्यांच्याकडे 3 लाख 80 हजार, स्ट्रीटलाईटचे 276 ग्राहक असून त्यांच्याकडे 10 लाख 70 हजार, नळयोजनेचे, पब्लिक वर्कस् व इतर मिळून सुमारे 370 ग्राहक असून त्यांच्याकडे 1 लाख 65 हजारपर्यंत थकबाकी आहे. अशी एकूण 12,900 ग्राहकांजवळ 31 लाखांची थकबाकी आहे.
देवगड थकबाकी 49 लाख
देवगड तालुक्यात 20 हजार 817 घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 20 लाख 50 हजार, वाणिज्यचे 1812 ग्राहक असून त्यांच्याकडे 7 लाख 80 हजार, औद्योगिकचे 368 ग्राहक असून त्यांच्याकडे 5 लाख 80 हजार, स्ट्रीटलाईटचे 377 ग्राहक असून त्यांच्याकडे 12 लाख 60 हजार, तर नळयोजना व इतरचे मिळून सुमारे 629 ग्राहक असून त्यांच्याकडे 2 लाख 60 हजार अशी 24 हजार 3 ग्राहकांजवळ 49 लाख 30 हजारची थकबाकी आहे.
कणकवली थकबाकी 1 कोटी
कणकवली तालुक्यात 27 हजार 858 घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 33 लाख 30 हजार, 3272 वाणिज्य ग्राहकांजवळ 17 लाख 20 हजार, 434 औद्योगिक ग्राहकांजवळ 9 लाख 70 हजार, स्ट्रीटलाईटचे 609 ग्राहक असून त्यांच्याकडे 22 लाख 60 हजार, नळयोजनांसह 693 ग्राहकांजवळ 20 लाख 40 हजार अशी 32,866 ग्राहकांजवळ 1 कोटी 3 लाख 4 हजारची थकबाकी आहे.
मालवण थकबाकी 51 लाख
मालवणात घरगुती ग्राहकांची संख्या 15,838 असून त्यांच्याकडे 17 लाख 10 हजार थकबाकी आहे. वाणिज्य ग्राहकांची संख्या 2042 असून त्यांच्याकडे 9 लाख 30 हजाराची, औद्योगिक ग्राहक 267 असून त्यांच्याकडे 3 लाख 70 हजारची, स्ट्रीटलाईटच्या 186 ग्राहकांकडे 19 लाख 40 हजारची थकबाकी आहे. नळयोजना व इतर मिळून 447 ग्राहक असून त्यांच्याकडे 2 लाखांहून अधिक मिळून 18 हजार 780 ग्राहकांजवळ 51 लाख 70 हजारची थकबाकी आहे.
वैभववाडी थकबाकी 40 लाखांची
वैभववाडी तालुक्यात 15,125 घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 17 लाख 20 हजार, 1549 एवढे वाणिज्य ग्राहक असून त्यांच्याकडे 7 लाख 20 हजाराची थकबाकी आहे. 259 औद्योगिक ग्राहक असून त्यांच्याकडे 2 लाख 51 हजार, 244 स्ट्रीटलाईटचे ग्राहक असून त्यांच्याकडे 7 लाख 80 हजाराची थकबाकी आहे. नळयोजना आदी मिळून 581 ग्राहक असून त्यांच्याकडे 5 लाख 20 हजार मिळून 17 हजार 758 ग्राहकांजवळ 40 लाख 10 हजाराची थकबाकी आहे.
कुडाळ 1 ची थकबाकी 73 लाख रुपये
कुडाळ 1 मध्ये 25 हजार 260 घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 31 लाख 80 हजार, वाणिज्य ग्राहक 3344 असून त्यांच्याकडे 13 लाख 70 हजाराची थकबाकी आहे. 641 औद्योगिक ग्राहक असून त्यांच्याकडे 7 लाख 70 हजार, 311 स्ट्रीटलाईटच्या ग्राहकांकडे 16 लाख 30 हजार थकबाकी आहे. नळयोजना व इतर मिळून 771 ग्राहक असून त्यांच्याकडे 3 लाख 50 हजार मिळून एकूण 30 हजार 327 ग्राहकांजवळ 73 लाख 30 हजारची थकबाकी आहे.
कुडाळ 2 ची थकबाकी 23 लाख
कुडाळ 2 मध्ये 9656 घरगुती ग्राहकांकडे 9 लाख 90 हजार, 1030 वाणिज्य ग्राहकांकडे 3 लाख 90 हजार, तर 169 औद्योगिक ग्राहकांजवळ 51 हजाराची थकबाकी आहे. 265 स्ट्रीट लाईटचे ग्राहक असून त्यांच्याकडे 7 लाख 30 हजार, नळयोजना व इतर मिळून 411 ग्राहक असून त्यांच्याकडे 1 लाख 20 हजार अशी एकूण 11,531 ग्राहकांजवळ 23 लाख 10 हजारची थकबाकी आहे.
सावंतवाडी ग्रामीण 33 लाख थकबाकी
सावंतवाडी ग्रामीणमध्ये 12,341 घरगुती ग्राहकांकडे 12 लाख 60 हजार, वाणिज्यच्या 1144 ग्राहकांजवळ 4 लाख, औद्योगिकच्या 157 ग्राहकांजवळ 2 लाख 80 हजार, तर स्ट्रीट लाईटच्या 271 ग्राहकांजवळ 11 लाख 20 हजाराची थकबाकी आहे. नळयोजना व इतरसाठी 387 ग्राहक असून त्यांच्याकडे 2 लाख 40 हजार अशी 14,032 ग्राहकांजवळ 33 लाख 20 हजाराची थकबाकी आहे.
सावंतवाडी नागरी थकबाकी 75 लाख
सावंतवाडी अर्बनमध्ये 27,806 ग्राहक असून त्यांच्याकडे 33 लाख 30 हजार, वाणिज्यच्या 3911 ग्राहकांजवळ 15 लाख 10 हजार, औद्योगिकच्या 414 ग्राहकांजवळ 5 लाख 20 हजारची थकबाकी आहे. स्ट्रीटलाईटच्या 350 ग्राहकांकडे 16 लाख 30 हजार, नळयोजना व इतर मिळून 828 ग्राहकांजवळ 5 लाख 10 हजार अशी 33,309 ग्राहकांजवळ 75 लाख 10 हजार थकबाकी आहे.
वेंगुर्ले थकबाकी 49 लाख
तालुक्यात 22,218 घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 21 लाख 70 हजार, 2244 वाणिज्य ग्राहकांकडे 7 लाख, 370 औद्योगिक ग्राहक असून 1 लाख 90 हजार, पथदीपांच्या 264 ग्राहकांजवळ 17 लाख थकबाकी आहे. नळयोजना व इतर मिळून 526 ग्राहक असून त्यांच्याकडे 1 लाख 31 हजार थकबाकी असून एकूण 25 हजार 622 ग्राहकांजवळ 49 लाख 10 हजाराची थकबाकी आहे.
विभाग एकूण ग्राहक एकूण थकबाकी
आचरा 12900 31 लाख 10 हजार
देवगड 24003 49 लाख 30 हजार
कणकवली 32866 1 कोटी 3 लाख 40 हजार
मालवण 18780 51 लाख 70 हजार
वैभववाडी 17758 40 लाख 10 हजार
कुडाळ 1 30327 73 लाख 30 हजार
कुडाळ 2 11531 23 लाख 10 हजार
सावंतवाडी ग्रा. 14302 33 लाख 20 हजार
सावंतवाडी शहर 33309 75 लाख 10 हजार
वेंगुर्ले 25622 49 लाख 10 हजार
सिंधुदुर्ग जिल्हा 221398 5 कोटी 29 लाख