ओटवणे/ प्रतिनिधी-
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या गुळदूवे येथील स्मिता रघुनाथ धरणे या महिलेला शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ अशा दोन एबी निगेटिव्ह रक्ताची तात्काळ गरज असल्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला समजताच या प्रतिष्ठानच्यावतीने त्वरीत दोन रक्त दाते उपलब्ध करून या महिलेचे प्राण वाचविण्यात आले.
यासाठी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे ओटवणे येथील सदस्य अमेय गावडे आणि वेंगुर्ले येथील केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांनी तात्काळ सावंतवाडीत धाव घेत रक्तदान केले. रक्तदाते महादेव आव्हाड आणि अमेय गावडे यांचे आजचे हे अनुक्रमे ६ वे व ५ वे रक्तदान असून यापूर्वीही त्यांनी तात्काळ रक्तदान केलेले आहे. या दोघांचे तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे धरणे कुटुंबियांनीआभार मानले