वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वषीच्या जानेवारी महिन्यात होणाऱया तीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी आपल्या समवेत फिजिओ आणि फिटनेस टेनरला प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने केली होती. सिंधूच्या या विनंतीला भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाकडून (साई) अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
भारताच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम कोअर गटामध्ये 26 वर्षीय पी. व्ही. सिंधूचा समावेश आहे. पुढील वषीच्या जानेवारी महिन्यात सिंधूचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन होत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे सिंधूला बॅडमिंटन क्षेत्रापासून तब्बल नऊ महिने अलिप्त रहावे लागले होते. जानेवारी महिन्यात तीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहेत. योनेक्स थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 12 ते 17 जानेवारी दरम्यान, टोयाटो पुरस्कृत थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 19 ते 24 जानेवारी दरम्यान तर बँकॉकमध्ये 27 ते 31 जानेवारी दरम्यान विश्व टूर अंतिम स्पर्धा होणार आहे.
या तिन्ही स्पर्धांमध्ये हैदराबादची पी. व्ही. सिंधू भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सध्या तिचे वास्तव्य लंडनमध्ये असून इंग्लंडमधील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ती इंग्लंडच्या टॉबी पिनेटी आणि राजीव ओसेफ समवेत बॅडमिंटनचा सराव करीत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून सिंधूने माघार घेतली होती. चालू वषीच्या मार्च महिन्यात लंडनमध्ये झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बॅडमिंटन स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे रद्द किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या.