इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज स्पर्धा
जकार्ता / वृत्तसंस्था
दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधूला इंडोनेशिया ओपन सुपर 1000 इव्हेंटमध्ये पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. सातव्या मानांकित सिंधूला चीनच्या हे बिंग जाओविरुद्ध 14-21, 18-21 अशा फरकाने धक्का सोसावा लागला. याशिवाय, बी. साई प्रणितचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. पी. साई प्रणितला डेन्मार्कच्या हान्स-क्रिस्तियन सोल्बर्ग व्हिटिन्गसने 21-16, 21-19 अशा सरळ फरकाने पराभूत केले. भारतातर्फे केवळ समीर वर्माला पुढील फेरीत पोहोचता आले. त्याने फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलला 21-19, 21-15 अशा फरकाने नमवले. आता दुसऱया फेरीत त्याची लढत मलेशियाच्या ली झिया जीविरुद्ध होणार आहे.