नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर (singhu border) शेतकऱ्यांचे आंदोलन (farmers protest) सुरु आहे. आंदोलनाच्या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या (Samyukta Kisan Morcha – SKM) मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह बांधला आहे. एका पोलीस बॅरिकेटला हा मृतदेह बॅरिकेट्सला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हत्याऱ्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला. या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार झालेले दिसत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय.
या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, “सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला.”