वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हॉटसऍपने आपली नवी पॉलिसी जाहीर करण्याचे सुतोवाच केल्यानंतर अनेकांनी व्हॉटस्ऍपमधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारायला सुरुवात केली आहे. याचा फायदा ‘सिग्नल ऍप’ला चांगलाच उठवता आला आहे. गेल्या काही दिवसात सिग्नल ऍपच्या डाऊनलोडमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान व्हॉटसऍपने आपली प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून अंमलात येणार असल्याचे म्हटलेले असले तरी त्यामध्ये आता बदल करण्याची तयारी व्हॉटसऍपने सुरू केली आहे. जेणेकरून व्हॉटसऍपवरील ग्राहकांचे खासगीत्व कायमस्वरुपी राहावे, अशी भूमिका आता घेतली जात असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. भारतामध्ये व्हॉटसऍप आणि फेसबुक हे एकाधिकारशाहीत चुकीचा वापर करत लाखो वापरकर्त्यांची खासगी माहिती उघड करत असल्याचे याआधी बऱयाचदा आपण पाहिलेले आहे. यावरूनच सध्या व्हॉटसऍपला नकारार्थी घंटा मिळताना दिसत आहे. अनेक ग्राहक सिग्नल ऍप डाऊनलोड करण्याच्या मागे लागले आहे. 8 फेब्रुवारीनंतर जे ग्राहक पॉलिसाशी एकनि÷ नसतील त्यांचे आपोआप खाते बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून ग्राहकांमध्ये असंतोषाची भावना उमटत आहे. येणाऱया काळात कदाचित व्हॉटस्ऍप प्रायव्हसीबाबतीतील भूमिका अजून मवाळ करू शकते.