माळमारूती चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी/बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित माळमारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी सिग्नेचर संघाने गणेश ज्वेलर्स बीसीसी संघाचा 58 धावांनी तर दुसऱया सामन्यात आर. एस. वॉरियर्स संघाने ऍडव्होकेट संघाचा 60 धावानी पराभव करून विजयी सलामी दिली.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे बी. एस. सुलतानपुरी, एच ए कोंगाली, सदानंद गुंडपण्णावर, समीर दोडण्णावर यांच्या हस्ते यस्टीला हार अर्पण करण्यात आला. यावेळी राघवेंद्र एच., राघवेंद्र दैवज्ञ, एन. बी. पाटील, ईरय्या कलमठ, रमेश पट्टणशेट्टी, सुनील सक्री, सचिन साळुंखे, परशराम पाटील, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन
केले. पहिल्या सामन्यात सिग्नेचर संघाने प्रथम फलंदाजी करताना सिग्नेचर संघाने 20 षटकात सात बाद 183 धावा केल्या. संतोष चव्हाणने 54, प्रमोद पालेकरने 38, राहुल शिंदेने 37, मनोज पाटीलने 24 धावा केल्या.
गणेश ज्वेलर्स तर्फे अनंत माळवीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गणेश ज्वेलर्स बीसीसी संघाने 19.4 षटकात सर्वबाद 125 धावा केल्या. राजू हनम्मण्णवरने 36, जयंत जाधवने 30 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे विनायक सिदलिंगने 3 तर प्रसाद नाकाडी व प्रमोद पालेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले .
दुसऱया सामन्यात आर. एस. वॉरियर्स संघाने आर. एस. वॉरियर्स संघाने 20 षटकात 5 बाद 228 धावा केल्या राहुल बजंत्रीने 5 षटकार सात चौकारांसह 86, सर्वोत्तम जारकीहोळीने 42, भावित पुजारीने 46 तर मनोहरने 30 धावा केल्या. सुनील सक्रीने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल ऍडव्होकेट संघाचा डाव 18.4 षटकात 168 धावात आटोपला. त्यात बसवराज जरळीने 42, शिवाजी पाटीलने 31, विजय कुरीने 28 धावा केल्या. आर. एस. वॉरियर्सतर्फे शंकरने 3, प्रशांत कुडची व सुनील पाटील यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रमुख पाहुणे अमित कुडची दत्ता एन व बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते सामनावीर संतोष चव्हाण, इम्पॅक्ट खेळाडू प्रमोद पालेकर, उत्कृष्ट झेल प्रवीण कराडे व सुपर सिक्सेस राजू यांना चषक देवून तर प्रमुख पाहुणे राहुल जारकीहोळी, लक्ष्मण पाटील, सागर अंगडी यांच्या हस्ते सामनावीर व सुपर सिक्सेस विजेता राहुल बजंत्री, इम्पॅक्ट खेळाडू सर्वोत्तम जारकीहोळी, उत्कृष्ट झेल शुभम चौधरी यांना चषक देवून गौरविण्यात आले