बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःच्या दमदार अभिनयाची छाप पाडणाऱया प्रियांका चोप्राने स्वतःची बहुप्रतीक्षित आगामी सीरिज ‘सिटाडेल’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. महामारीच्या अवघड काळातही या प्रोजेक्टवर काम करण्याला अभिनेत्रीने आतापर्यंतचा स्वतःचा ‘मोस्ट इंटेस वर्क’ ठरविले आहे. प्रियांकाने सिटाडेलच्या रॅप अपची घोषणा करत सेटवरून रिचर्ड मॅडेन आणि अन्य कलाकारांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले आहे.
सिटाडेलच्या चित्रिकरणादरम्यान प्रियांका स्वतःच्या कामाची झलक चाहत्यांसोबत शेअर करत राहिली आहे. या सीरिजमध्ये काम करणे प्रियांकासाठी अद्भूत अनुभव ठरला आहे. सिटाडेल हा प्रियांकाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. याचबरोबर प्रियांका ‘द मॅट्रिक्स ः रिसरेक्शन्स’मध्येही दिसून येणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी झळकणार आहे.