Q
येथे होणारी सिटी ओपन टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. कोव्हिड 19 च्या ब्रेकनंतर या स्पर्धेपासूनच पुरुष एटीपी टूरला सुरुवात होणार होती.
आधीच्या नियोजनाप्रमाणे 14 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होणार होती. अमेरिकन ओपनची तयारी करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेकडे पाहिले जात होते. पण प्रवासावरील निर्बंध आणि कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ही स्पर्धा आम्हाला नाईलाजाने या वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे स्पर्धा चेअरमन मार्क आइन यांनी सांगितले. ही स्पर्धा रद्द केल्यामुळे यूएस ओपन स्पर्धेबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत प्रेक्षकांशिवाय घेतली जाणार आहे. डब्ल्यूटीए टूर महिला टेनिस स्पर्धेला 3 ऑगस्टपासून इटलीतील पालेर्मो येथे सुरुवात होणार आहे.