प्रतिनिधी / सातारा
नगरपालिका हद्दीत येणाऱ्या सिटी पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे. तातडीने पालिकेच्या आरोग्य विभागाने ती राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक सुनील काळेकर यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सातारा सिटी पोलीस लाईनध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. पोलीस बांधव हे जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र राबत असतात. त्यांच्या हक्काची सेवा देण्यासाठी अभाव दिसून येत आहे. केवळ निवडणूक काळात मत मागण्याकरिता न जाता त्यांच्या आरोग्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. म्हणूनच भाजपच्यावतीने आम्ही मागणी करत आहोत की सातारा सिटी पोलीस लाईनमध्ये वाढलेले गवत, गटारे अस्वच्छ यामुळे वाढलेली मच्छरांचा प्रादुर्भाव यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सातारा सिटी पोलीस लाईनमध्ये तत्काळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.