सिडनी
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्रकारच्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 370 वर पोहचली असल्याने प्रशासनाने 17 जुलै तारखेपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत. गेल्या महिनाभरात लॉकडाऊन दोन आठवडे कडक असूनही रुग्णसंख्या वाढल्याने राज्य सरकारला निर्बंध आणखी कडक करावे लागणार आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने स्टे ऍट होम (घरीच रहा) ही मोहीम 17 जुलैपर्यंत राबवण्याचे ठरवले आहे. गुरुवारी 38 कोरोना रुग्ण सिडनीत आढळले असून डेल्टाच्या रुग्णांची संख्या 370 वर पोहोचली आहे. 14 महिन्यानंतर ही एवढी वाढीव संख्या सिडनीत दिसली आहे. लोक सध्या नातेवाईक आणि मित्रांच्या घरी भेटत असून याने कोरोना प्रसार अधिक होण्याची भीती प्रशासनाला वाटते आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.