वृत्तसंस्था/ सिडनी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे शनिवारी झालेल्या सिडनी टेनिस क्लासिक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नवव्या मानांकित पाओला बेडोसाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना क्रेसिकोव्हाचा पराभव केला.
या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात नवव्या मानांकित बेडोसाने बार्बोरा क्रेसिकोव्हाचा 6-3, 4-6, 7-6 (7-4) असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील बेडोसाचे एकेरीतील हे तिसरे विजेतेपद आहे. हा अंतिम सामना तब्बल अडीज तास चालला होता. मागील वर्षी इंडियन वेल्स स्पर्धेत बेडोसाने बेलारूसच्या अझारेंकाचा पराभव करून जेतेपद पटकाविले होते.