अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’मध्ये दिशा पटानी आणि राशि खन्नाची एंट्री झाली आहे. यासंबंधीची माहिती सिद्धार्थनेच सोशल मीडियावर दिली आहे. सागर अम्ब्रे आणि पुष्कर ओझा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जौहरचे धर्मा प्रॉडक्शन्स आणि शशांक खेतानच्या ‘मेंटर डिसिप्लिन फिल्म्स’कडून केली जात आहे. सिद्धार्थ या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मागील महिन्यात याचे चित्रिकरण सुरू करण्यात आले आहे.
सिद्धार्थने 2 नवी पोस्टर्स शेअर करत हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी झळकणार असल्याची माहिती दिली आहे. या ऍक्शनने भरपूर प्रवासाठी उत्साही असल्याचे दिशाने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर नमूद केले आहे. टीम योद्धाला जॉईन करणार असल्याचे सांगताना अत्यंत आनंद होत असल्याचे राशिने म्हटले आहे. सिद्धार्थचा यापूर्वी प्रदर्शित झालेला शेरशाह चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. यातही त्याने भारतीय सैन्य अधिकाऱयाची भूमिका साकारली होती.