प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी उत्सव साजरा करता येत नाही. यामुळे सध्या संकटात सापडलेल्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी सिद्धिविनायक देवस्थान समिती, महषी रोड, महात्मा गांधी रोड, टिळकवाडी यांच्यावतीने मुख्यमंत्री रीलिफ फंडाला 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सिद्धिविनायक देवस्थान समिती दरवर्षी उत्सव साजरा करत असते. मात्र, यावषी कोरोनासारख्या संकटाचा सामना देशाबरोबरच जगाला करावा लागत आहे. कर्नाटक सरकार सर्वपरीने मदत करत आहे. त्यांचे काम उत्तम चालले आहे. त्यामुळे त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. हे ओळखून आम्ही मदत करत असल्याचे सेवा समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गिंडे यांनी सांगितले. यावेळी सचिव पंढरी परब, विश्वस्त वैजनाथ गिलबिले, सतीश गोडसे, राजू दळवी, अशोक तवनोजीचे, सुबोध गावडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. सिद्धिविनायक देवस्थान सेवा समितीचे कार्यकर्ते मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेकांना मदत करण्याची इच्छा आहे. मात्र ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तेव्हा कोणालाही मदत द्यायची असल्यास ती आमच्याकडे द्या. गरजूपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असे कळविण्यात आले आहे. चपाती-भाजी असो, खाद्यपदार्थ असो किंवा इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. तेव्हा ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव पंढरी परब यांनी केले आहे.