प्रतिनिधी/ बेळगाव
श्री सिद्धीविनाय साप्ताहिक फंड अनगोळ आयोजित अनगोळ मर्यादीत कबड्डी स्पर्धेत सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाने भगतसिंग संघाचा 17 गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
केदारी जाधव यांच्या हस्ते मैदानाची पूजा व कबड्डीची राईड करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धेत अनगोळ येथील 10 कबड्डी संघांनी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भगतसिंग संघाने भांदुरगल्ली संघाचा 17-13 अशा गुण फरकाने तर सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाने श्रीराम कॉलनी संघाचा 22-14 गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात सिद्धीविनायक संघाने भगतसिंग संघाचा 20-3 म्हणजे 17 गुणांनी एकतर्फी पराभव करून या स्पर्धेचे अजिंक्मयपद पटाकाविले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धीविनायक संघाचे सभासद भावेश ताशिलदार, संदेश कलखांबकर, आकाश सुणगार, सचिन आर. के. व सागर लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.