कागल / प्रतिनिधी
कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली निदीकिनारा येथे तरूणावर खुनी हल्ला करण्यात आला.-शुकवारी रात्री ही घटना घडली आहे . या प्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात जूलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , सिद्धनेर्ली निदीकिनारा येथे युनुस इस्माईल शेख आणि रोहित आनंदा पाटोळे हे दोघेजण राहतात. हे दोघे एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. शुकवारी दोघेजण मोटरसायकलीवरून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. परत येतअसताना दऱ्याचे वडगांव येथे गाडीवरून उतरण्याच्या कारणावरून दोघात भांडण झाले. याचा राग मनात धरूण रोहित पाटोळे आणि त्याचा सख्खा भाऊ राहूल ने युनुसवर त्याच्या घरात जाऊन चाकू आणि लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला. रोहित पाटोळे याने युनुसच्या दंडावर आणि पाठीवर दोन ठिकाणी गंभीर वार केले आहेत. यावेळी युनुसला सोडवायला गेलेल्या त्याची आई रुक्साना आणि बहिण करिश्मा या दोघींनाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी युनुस ने राहित आणि राहूल पाटोळे यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी पाटोळे बंधूवर खूनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी हे करत आहेत.