वृत्तसंस्था/ कोलॉन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या खुल्या कोलॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा नवोदित यानीक सिनेर आणि जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या सिनेरने फ्रान्सच्या सिमॉनचा 6-3, 0-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱया एका सामन्यात जर्मनीचा टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना फ्रान्सच्या मॅनेरिनोचा 6-4, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव केला.