”कोल्हापूर के मकान छोटे है… लेकीन लोगोंका दिल बडा है”
कोल्हापूर / संजीव खाडे
10 सप्टेंबर 1980 चा दिवस. माळकर तिकटी ते मटण मार्केट हा लुगडी ओळीचा रस्ता पब्लिकने फुल्ल भरला होता. अगदी सिनेमाची टॉकीज हाऊसफुल्ल होते, तशी स्थिती होती. निमित्त होते ऐतिहासिक मेढे तालमीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचे. आणि त्यासाठी येणार होते सिनेसम्राट युसूफ खान उर्फ दिलीपकुमार. साऱयांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर दिलीपकुमार यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत तत्कालिन विरोधी पक्ष नेते शरद पवारही होते. दिलीपकुमार व्यासपीठावर येताच जमलेल्या समस्त कोल्हापूरकरांनी उभे राहून टाळÎांच्या गजरात, शिट्टÎा वाजवत दिलीपकुमार यांचे स्वागत केले. चाळीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आज 7 जुलै 2021 रोजी पुन्हा ताजा झाला. दिलीपकुमार यांच्या निधनाचे वृत्त येतात कोल्हापूरवासीयांनी या महान अभिनेत्याच्या आठवणी जागवल्या.
कोल्हापूर के लोगो का दिल बड है….
मेढे तालमीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी दिलीपकुमार यांनाच आणण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले. त्यावेळचे अध्यक्ष माजी नगरसेवक शरद मेढे-पवार, सचिव बाळासाहेब मेढे-पवार, कादर मलबारी, मोहम्मद शरीफ शेख, सिकंदर मणेर, गौस नदाफ या कार्यकर्त्यांनी त्यावेळी जिल्हÎाचे नेते माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्याकडे आग्रह धरला. बोंद्रेदादांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून दिलीपकुमार यांना आणण्यासाठी विनंती केली. पवारसाहेबांच्या आग्रहाला मान देत महान सिनेसम्राट कोल्हापूरमध्ये आला. उद्घाटन कार्यक्रमाची आठवणींना उजाळा देताना बाळासाहेब मेढे, कादर मलबारी सांगितले, दिलीपकुमारांना पाहण्यासाठी संपूर्ण लुगडी ओळ रस्ता भरला होता. तालमीच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर दिलीपकुमार यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरची कला, क्रीडा परंपरा, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. आपल्या भाषणात त्यांनी `मै जहाँ पैदा हुआँ उस पेशावर जैसा आपका ये कोल्हापूर है.
यहाँ के मकान छोटे है लेकीन यहाँ के लोगोंका दिल बडा है, असे आपल्या अनोख्या शैलीत सांगतात, उपस्थित कोल्हापूरवासीयांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दिलीपकुमार यांना दाद दिली. आपल्या भाषणात दिलीपकुमार यांनी कोल्हापूरची कला, क्रीडा परंपरा, चित्रतपस्वी भालजी पेंढाकर यांच्या योगदानाचे कौतुक केले. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या कार्यामुळे कोल्हापुरात एकता नांदत असल्याचा उल्लेखही दिलीपकुमार यांनी केला. तासाभराच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना ऍटोग्राफ (स्वाक्षरी) दिला. फोटो काढून दिले. आम्हा कार्यकर्त्यांबरोबरही त्यांनी फोटो काढला. त्यांच्या रूपाने महान अभिनेत्यांबरोबरचा सहवास लाभला, तो अविस्मरणीय असाच आहे.
महापालिकेत सत्कार आणि बोंद्रेच्या घरी कोल्हापूरी मटणावर ताव
मेढे तालमीचा कार्यक्रम उरकल्यानंतर दिलीपकुमार कोल्हापूर महापालिकेत दाखल झाले. त्याचा तत्कलिन महापौर द. न. कणेरकर, उपमहापौर आर. के. पोवार यांच्या हस्ते नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या निवासस्थानी दिलीपकुमार यांनी कोल्हापुरी मटण, रस्सा, ज्वारीची भाकरी यांचा आस्वाद घेतला. यावेळी पहिले महापौर बाबासाहेब कसबेकर, बाळासाहेब मुळे उपस्थित होते. यावेळी महान अभिनेत्याबरोबर भोजन करण्याचे भाग्य लाभल्याची आठवण राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितली.
दिलीपकुमार यांचे कोल्हापूरशी नाते… भालजींची स्नेह
दिलीपकुमार यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांशी त्यांचा स्नेह होता. भालजींना ते मामाजी म्हणत. जयप्रभा स्टुडिओलाही त्यांनी भेट दिली. राम और श्याम' आणि
गोपी’ चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी दिलीपकुमार पन्हाळा, कोल्हापूरमध्ये आले होते. इचलकरंजीच्या पंडीतराव कुलकर्णी यांच्या फाय फौंडेशनने दिलीपकुमार यांना पुरस्काराने गौरविले होते.
दिलीपकुमार यांचे कोल्हापुरात पाहुणे
दिलीपकुमार यांचे बाटलीवाला नामक एक नातेवाईक कोल्हापुरात होते. नागाळापार्क परिसरात बाटलीवाला राहतात. कोल्हापुरात आल्यानंतर दिलीपकुमार बाटलीवाला यांच्या घरी जात असत.