नवी दिल्ली
औषध निर्माती कंपनी सिप्लाने जानेवारी ते मार्चच्या तिमाहीअखेर 412 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नेंदवला आहे. सदरचा नफा हा 73 टक्के अधिक असल्याचे सांगण्यात येते.मुंबईच्या या कंपनीने 2019-20 वर्षात जानेवारी-मार्चमध्ये 238 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीला 4 हजार 606 कोटी रुपयांचा महसूल दरम्यानच्या कालावधीत प्राप्त झाला असून मागच्या वर्षी समान कालावधीत तो 4 हजार 376 कोटी रुपये इतका नोंदला गेला होता. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने एकत्रित निव्वळ नफा 2 हजार 389 कोटी रुपये मिळवला आहे.