बेंगळूर
औषध क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी सिप्ला यांना डिसेंबर 2021 संपलेल्या तिमाहीत 756.88 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला असल्याचे समजते. याआधीच्या वर्षात समान अवधीत कंपनीने 751.6 कोटी रुपये नफा प्राप्त केला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 6 टक्के वाढून 5 हजार 478 कोटी रुपयांवर पोहचला. त्याच्या मागच्या वर्षात याच अवधीत कंपनीचा महसूल 5 हजार 169 कोटी रुपये राहिला होता.